एका चुकीनं …. होरपळली चार आयुष्य

Started by SANJAY M NIKUMBH, April 20, 2014, 02:11:21 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

एका चुकीनं .... होरपळली चार आयुष्य
=========================
ती धाय मोकलून रडत होती
त्याचे पाय धरत
तू जसा ठेवशील तशी राहीन मी
पण मला अंतर नको देऊस

तो लाथाडत होता
त्याच्या लग्नाच्या दिवशी
दुसरीचा हात धरून
मंडपात शिरत होता

ती ओरडून सांगत होती
असं कां वागलास तू
मी तर तुझ्यावर सारं काही उधळून दिलं
वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर

घरून विरोध होता
तुला तर माहितच होतं
त्यांना डावलून तुला घरात आणणं
मला कधीच शक्य नव्हतं

अरे पण तूच तर जाळं टाकलसं
माझ्या मनावर प्रेमाचं
अन तुझ्यात फसत जाऊन
तुझ्याच सांगण्यावरून दिला काडीमोड नवऱ्याला

ती बोंबलत होती मोठ्याने
पण तो कुठे ऐकणार होता
आता कळली तिला
तिच्या हातून घडलेली चूक किती मोठी होती ते

थोडं भूतकाळात डोकावतांना
दिसत होतं तिला सारं काही स्पष्ट 
तिचा नवरा तिला समजावत होता
पण ती वेडी होती याच्या प्रेमात

आता अश्रू ढाळून काहीच मिळणार नव्हतं
"तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटण आलं" अशी झाली तिची अवस्था
आताही पहिल्या नवऱ्यासोबत रहातेय ती एकाच घरात
काडीमोड घेतल्यान शारीरिक अंतर ठेऊन
त्याचं म्हणाल तर बाईवरचा विश्वासच उडालेला
पण हि कुठे जाईल
म्हणून स्वीकारलंय त्यानं असं आयुष्य
जे नियतीने त्याच्या पुढ्यात मांडून ठेवलंय तसं

तिकडे तो हि तिला स्वीकारू शकत नाहीये
हिच्यावरच्या प्रेमाखातर
त्याचा जीव अडकलाय त्याच्या मुलात
इकडे हि झोपेच्या गोळ्या खाऊन
किडनीच्या आजाराने झालीय त्रस्त
फक्त एका चुकीनं होरपळली चार आयुष्य
सारं काही उध्वस्त जिकडे तिकडे अस्ताव्यस्त
==============================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २०.०४.१४  वेळ : १.०० दु .