घडणारं घडत राहतं.......

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 22, 2014, 04:27:27 PM

Previous topic - Next topic
घडणारं घडत राहतं
त्यावर कुणी हसतं 
तर दुखी मन तेव्हा मात्र रडत राहतं

कुणाचे स्वप्न सत्यात तर कुणाचे
आयुष्यंच   उध्वस्त होतं
आयुष्याच्या खेळात बहुधा
असंच काही  घडत राहतं

कुठे वसलेलं गाव ते
नदीच्या किनारी
वाहत्या पाण्याचा खळखळाट  ही ते
मरणावर एखाद्याच्या चुपचापच निघून   जातं

आंधळी  होते रात्र ही तेव्हा
जीव निघून जातो जेव्हा
दिसू लागतात नजरांना
आपलीच लोक रडतांना
देता ही येत नाही आवाज असण्याचा
कळतं मिळाला मृत्यू तेव्हा

जाळून जातं घर काहींच
विजत नाही अश्रूंनी ती आगही तेव्हा
आली ती लेकरं रस्त्यावर
छत्र मात्र कुठेच नाही
देवाकडे  पाहून मग
विसरून जातो तो माणुसकीही  तेव्हा....

घडणारं घडत राहतं
कुणी हसतं 
कुणी रडत राहतं  ............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२२-०४-२०१४