आई सांग ना ग तु.....

Started by Shivshankar patil, April 24, 2014, 05:22:30 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

      आई सांग ना ग तु

     आई सांग ना ग तु ......
गर्भात मला ठेवशील का  तु..
का गर्भपात करून मारशील...
     आई सांग ना तु
जन्मल्यावर माझा लाड करशील का १
का नकोशी म्हणुन संभाळ करशिल....
     आई सागं ना तु
बालवाडीत जाऊ का नको मी १
नरधाम स्कुल बस ड़्रायवर घात करतील की काय ....
     आई सांग ना तु
अंगणात खेळु का नको मी १
विकृत शेजारी ऊचलून नेतील की काय....
     आई सांग ना तु
शाळा कॉलेजात जाऊ का नको मी १
एकटी एकटी जाताना हे टवाळखोर छेडतील की काय....
     आई सांग ना तु
स्पर्धेत भाग घेऊ का नको १
तथाकथीत परिक्षक मला
कास्टींग काउच बनवतील की काय....
     आई सांग ना तु
लग्न करु की काय १
दादला माझा हुंड्या साठी
नरडीचा घोट घेईल की काय .....
     आई सांग ना तु
जगलीस कशी तु या
हिंस्ञ श्वापदाच्या दुनीयेत  १.
  आई सांग ना ग तु ......