प्रेम अस काहीच नसत...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 25, 2014, 11:22:38 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

फसव्या जगात
नात्यांची संगत
मेल्यावर बसते
माणसांची पंगत
तोंडावर मित्र
पाठीवर शत्रु
वेळ आल्यावर
सर्वांची किम्मत
इष्टेटी साठी
वडिलांची सेवा
भाऊ भावाचा
करतो हेवा
ओठावर प्रेम
हातात सूरी
हल्लिचे नाते
गळ्यातली दोरी
भासता गरज
उघडते सत्य
तेव्हाच कळते
प्रेम अस काही नसत...
प्रेम अस काही नसत...

... अंकुश नवघरे
   (स्वलिखित)
दि. २५/०४/२०१४
वेळ. १0:३६ pm