फसवे सुख...

Started by श्री. प्रकाश साळवी, April 26, 2014, 02:01:28 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

पाहून चित्र सारे मन मनालाच फसवीत होते 
दुखा:तच सुख मानून मलाच हरवीत होते

अंधार रात्र काळी माझे दिवे मिणमिणते
नाच त्यांचे बेभान पणाचे झगमगाट त्यांचे सूर्य होते

बुडाले जलाशय पण पाण्याला ना बंध येथे
प्यायला पाणी नसे ना माणसे-पक्षी मरत होते

अगणित बेहिशोबी "स्विस बँकेचे" भीकारी
दोनशे रुपड्यांसाठी कामकरी मात्र बारा तास मरत होते

सुखाचे मार्ग आणखी हवे कशाला?
मी मात्र दुखा:ला साथ करून सुख समजावीत होते 

श्री. प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.