=====वागा पण कसे=====

Started by pomadon, September 21, 2009, 07:41:10 PM

Previous topic - Next topic

pomadon


   =====वागा पण कसे=====
१)"शीलं परं भूषणम्" या वचनाप्रमाणे सदाचाराला अधिक महत्त्व द्यावे.

२)स्वावलंबाने व स्वाभिमानाने राहावे.

३)आपले विचार,उच्चार व आचार शुद्ध असावे.

४)वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष्य द्यावे.

५)आपल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होणार नाही,याची काळजी घ्या.

६)सौजन्य व शिष्टाचार कटाक्षाने पाळावे.

७)अंगी गर्व बाळगू नये."गर्वाचे घर खाली"; हि उक्ती सदैव लक्षात ठेवावी.

८)दिलेला शब्द पाळण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे.

९)दुसर्‍याला दोष देण्यापूर्वी आपले काही चुकले आहे काय
   याचा विचार आधी करावा. त्यात मनाचा मोठेपणा असतो.

१०)आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, नेहमी उद्योगात राहावे.

११)'लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्यसंपत्ती भेटे', हे लक्ष्यात ठेवावे.

१२)देव आई-वडील व समाज यांचे ऋण फेडण्यासाठी तत्पर असावे.

१३)बुद्धी श्रेष्ठ असते, बुद्धीचा उपयोग करा, मनाला ताब्यात ठेवा.