पुनवेचे चांदणे

Started by श्री. प्रकाश साळवी, April 26, 2014, 03:08:43 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

चांदणे अंधारी फितूर झाले
रात्रीचे प्रकाशाशी सुत जमले
उजळून निघाल्या चांदण्या प्रकाशाने विजेच्या
अन काजव्यांचे थवेच्या थवे नाचले
*
पसरले आकाशाचे वादळ पंख
मिटले ते अंधकारी मारून डंख
मोडून निघाला पुनवेचा तो चंद्र तो
आकाश सागरीचा प्रकाश शंख
*
पसरला पुनवेचा तो प्रकाश सागर
ढवळून निघाला तीमिरांचा खंदर
चांदण्यांनी लुटले सारे लख लख
निशब्द चांदणे अन निर्सर्ग सुंदर

श्री. प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.