तुझ्याकडे काय आहे का रे, माझ्या नावाचं ?

Started by प्रसाद जेडगे, April 26, 2014, 08:35:53 PM

Previous topic - Next topic

प्रसाद जेडगे

एक कविता आली होती WhatsApp वर

विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......

देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .

हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .

भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .

माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .


नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .

गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .

मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .

पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .

आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.

वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .

घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.

नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .

इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .

माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....

तुझ्याकडे  काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?

प्रसाद जेडगे

यावर त्याचं उत्तर

हळद माझ्या नावाची,
देह तुझा.

मेहंदी माझ्या नावाची,
हात तुझा.

सिंदूर माझ्या नावाचा,
भांग तुझा.

बिंदिया माझ्या नावाची,
माथा तुझा.

नथ माझ्या नावाची,
नाक तुझे.

मंगळसूत्र माझ्या नावाचे,
गळा तुझा.

(बांगड्या) चुडा माझ्या नावाच्या,
मनगट तुझे.

जोडवी माझ्या नावाची,
पाय तुझे.


आणि हो.....
अखंड सौभाग्यवती भव
आशिर्वाद तुला ( तो पण माझ्यासाठी..),
मात्र वडीलधा-यांच्या
पाया तु पडते.

आयुष्याचे वरदान मला,
वटपौर्णिमेचे व्रत तुझे.

दरवाजावर नावाची प्लेट माझी,
घराची काळजी घ्यायची तु.


इतकच काय .......
ऊदर तुझे ,
रक्त तुझे ,
दूध तुझे ,
आणि मुलं ?
मुलं माझ्या नावाची .

नाव माझं तर,
सगळच तुझं ......
राग नाही ...
अत्यंत नम्रपणे
एक सांगतोय..

तुझ्या नावात मी अन माझ्या तु ।
तुझ्याशिवाय मी अपूर्ण अन माझ्याशिवाय तु ..... !

kuldeep p

उत्तर माझे

हो खरं आहे
अंग तुझं असतं पण हळद माझ्या नावाची लावतेस
पण मी नसतो तर तुला हळद कोणी लावली असती

हात तुझे असतात पण मेहंदी माझ्या नावाची
जेव्हा तुझी मेहंदी खूप रंगते आणि ते बघून जेव्हा तुला कोणी बोलत "अरे वाह काय मेहंदी रंगलीय? " तेव्हा तू बोलतेस "हो तेवढा प्रेम करतो तो माझ्यावर "
जर मी नसतो तर तू कोणाचा नाव घेतला असतास?  मेहंदी कोणासाठी लावली असतीस?

कपाळ तुझं पण कुंकू माझ्या नावाचं
मी नसेल तर तुझ्या कुंकुवाला काय अर्थ? कुंकू लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला असता?

गळा तुझा पण मंगळसूत्र माझ्या नावाचं, हात तुझे पण चुडा माझ्या नावाचा, पाय तुझे पण जोडावी माझ्या नावाची
मी जर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातला नसत तर हक्क कोणावर गाजवणार ? संकटातून तुला वाचावयाला कोण येणार ?
सुखात तर सगळेच  पण दुखात तुला कोणी साथ देणार ?
हे सगळा तू माझ्या नावाने घालतेस ना?
एकदा हे सगळ काढून बघ स्वतः कडे "बाई" म्हणून किती अर्थहीन वाटतेस तू
तू असशील, असशील काय आहेच सुंदर पण माझ्या नावाने घालणाऱ्या या वस्तू मुळे तुझे सौंदर्य वाढते हे विसरू नकोस.

वडीलधार्यांच्या पाया तू पडतेस पण आशीर्वाद मात्र मला मिळतो, वट पौर्णिमेचे व्रत करून वरदान मात्र मला मिळते.
हे जग खूप मतलबी आहे अशा मतलबी दुनियेत तुझा विचार करणारा, प्रत्येक गोष्टीत तुझाच विचार करणारा, शेवट पर्यंत तुझी  देणारा,  प्रेम करणारा मीच असेन हे मात्र विसरू नकोस.

घराची काळजी घेतस तू पण घरावर नाव मात्र माझा असत
हो खरा आहे, त्या घराला सावरणारा, सांभाळणारा मात्र मीच आहे हे तू विसरतेस

रक्त तुझ, उदर तुझं, दुध तुझं, मुल? मुलाला नाव मात्र माझं
हो हे  आहे
पण तू विसरतेस तुला आई म्हणून आणि मला बाबा म्हणून हाक मारणारा/ मारणारी या जगात येण्यासाठी जेवढा सहभाग तुझा आहे तेवादाच माझा देखील आहे. तुझ्याशिवाय मी बाबा आणि माझ्या शिवाय तू आई होऊ  नाही हे विसरू नको. मुलाला जन्माला घालताना जेवढ्या यातना तुला  होतात तेवढ्याच यातना त्याला पोसताना, वाढवताना, हट्ट पुरवताना त्याच्या बाबाला होतात.

एका बाबाचं आणि एका नवऱ्याच त्याच्या बायकोवर आणि त्याच्या मुलांवर असणारा प्रेम असच असता न बोलता सर्व काही देणारं,  त्यांच्यासमोर आणणारं. एका नवऱ्याच आणि एका बापाचं प्रेम हे असाच असतं तो सर्वकाही करतो पण नाव मात्र कुठेच येत नाही.  मी कधीही एका स्त्रीच्या, आईच्या अस्तित्वावावर कधीच  प्रश्नचिन्ह केला नाही . आज वाईट एवढ्याच गोष्टीचा वाटत कि तुम्ही मात्र आमच्या अस्तित्वावर लावलेला हा "?"