तू …. चक्री वादळ

Started by SANJAY M NIKUMBH, April 27, 2014, 07:38:51 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू .... चक्री वादळ
====================
कितीही घेतला मागोवा मनाचा
काहीच थांगपत्ता लागत नाही
मी कशी अडकले तुझ्यात
मज काहीच आठवत नाही

कुठल्या त्या धुंद क्षणी
तू घेतलास मनाचा ताबा
कित्ती कित्ती विचार करते
काहीच उत्तर मिळत नाही

पण तू वेढलंय मनाला
अगदी चारी बाजूंनी नकळत
चक्री वादळाच्या भोवऱ्यात सापडावं
तशी तुझ्यासवे निघाले मी

कुठून आला इतका विश्वास
की उधळले सारे तुझ्यावर
क्षण क्षण असते तहानलेली
प्रेमाची जादू केलीस मनावर

पण तुझ्यासोबत वहात जातांना
आनंदाच्या लहरींवर झुलत मन
तुझ्या प्रत्येक स्पर्शासाठी सख्या
झुरत असतं माझं मन
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २७.४.१४ वेळ : ७.२० स.