आयुष्याची वाट

Started by Sachin01 More, April 27, 2014, 11:31:12 AM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आयुष्याची वाट आहेच थोडी नीराळी,
गेली घाट की लागे माती काळी।
वेद्नान्ना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।१।।

अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन चालताना।।२।।

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावी।
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।३।।

जगण्याची वाट थोडी अवघड असते,
कधी सखोल तर कधी नागमोडी वळते।
वळताना जगण्याची रितही कळते,
आपन नसलो तरी वाट जगते।।४।।

'वाट' लागण्यात सुध्धा
'वाटे'चीच बाजी।
चुकली 'वाट' तरी
'वाटे'चीच बाजी।।५।।
Moregs