माझा बाप

Started by Sachin01 More, April 27, 2014, 11:43:17 AM

Previous topic - Next topic

Sachin01 More

शेतात राबतोय माझा बाप,
प्रेम करण्यात त्याला नाहिच माप।
माझ्यासाठी केली त्याने आयुष्याची माती,
काढ्ल्यात त्याने कित्येक ऊपाशीच राती।।१।।

आईस्ंग भांडताना जर झाला आवाज फ़ार,
माझ्या कानाखाली पडायच्या दोन-चार।
प्रेमापोटी त्याने परत कुशित घ्यायचं,
समजवताना मज उगी उगी रडायचं।।२।।

शाळेमंदी असताना आला होता तालुक्यात नंबर,
बक्षिस मिळालं शंभराच्या वर।
पाहुन माझा बाप झाला अनावर,
लोक म्हणताय अडाण्याचं लेक हाय साक्षर।।३।।

हिंमतीने दिलं त्याने मज ऊभरुन,
सारं जीवन काढलं गरिबीत राहुन।
पाहुन त्याच्या डोळ्यामंदी आता,
माझा ऊर का येई भरुन नुस्ता।।४।।

↝↝S. More↜↜
Moregs