तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 27, 2014, 12:19:02 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...

पूर्ण काय अपूर्ण काय
तुझ्याशिवाय मी माझ्याशिवाय तू काय
ह्या प्रश्नाच उत्तर काय
तरीही जाणवते की खरच
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...
प्रेम काय ओढ़ काय
तुझ्यासाठी मला माझ्यासाठी तुला
जे वाटतेय ते काय
तरीही कळतेय की खरच
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...
शरीर काय मन काय
शरीराचे सुख मनाचे समाधान काय
आपल्या मधे निर्माण झालेले ते नाते काय
तरीही अनुभवास येते की खरच
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...
तू काय अन मी काय
दोघंच्यातली एक धकधक काय
तरीही ह्रदय धडकुन सांगते की खरच
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...
हा देह काय हा आत्मा काय
जन्ममृत्युच त्याला बंधन काय
तरीही दैव मला पुन्हा पुन्हा हेच सांगते की
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...

... अंकुश नवघरे
   (स्वलिखित)
दि. २७/०४/२०१४
वेळ. १२:०२ दुपार