तीच्यासोबतची ती दुसरी भेट!!!!!

Started by vidyakalp, April 27, 2014, 12:22:55 PM

Previous topic - Next topic

vidyakalp

आजचा रविवार माझ्यासाठी स्पेशल होता
तीचा भेटीचा आज दुसरा दिवस होता
त्यादिवशी राहीलीली हितगुज
आज रंगणार होती
तीच्यामाझ्यातील मैफिल पुन्हा
जमणार होती
ती यायच्या अर्धातास आधी
मीच तीथे पोचलो
तीच्या येण्याची वाट बघत बसलो
तीला यायला अजुन उशीर होता
मला प्रत्येक सेकंद अर्धातास होता
वेळ जाता जात नव्हता
तीथे आजुबाजुला कुणीच नव्हता
एकसारखा संथ वाहणा-या
पाण्याकडे पाहत होतो
डोक्यात कविता उतरवत होतो
तीच्या येण्याची चाहुल लागली
मला आलेल पाहुन ती थोडी दचकली
घड्याळाकडे पाहून हळूच बोलली
मला यायला उशीर झाला ना
तीला सावरत मी बोललो
मीच थोडा लवकर आलो
आज सुरूवात करावी लागली नाही
गप्पाची जशी यादी तयार होती
दोघे एकमेकांना पाहत होतो
चेहरा ह्रदयात बसवत होतो
बोलता बोलता वेळ गेली संपुन
दोघांना बोलायच होत अजुन
तीला जाणे मान्य नव्हते
तीथे राहणेही शक्य नव्हते
मी तीची समजुत काढली
जाताना तीला भेट दिली
ती घरी जाऊ लागली
प्रत्येक पावलावर मागे पाहू लागली
पुन्हा दोघांचा प्रश्न तोच
पुन्हा कधी भेटायच......
पुन्हा कधी भेटायच......

$ vidyakalp $