चंद्र

Started by sweetsunita66, April 27, 2014, 06:41:53 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

चंद्रा कडे कधी
कधीच का पाहायचं ?
त्याच्याशी तर रोज
हितगुज करायचं .
सुर्यासारखा तो आपल्याला
कधी का भाजतो ,
शीतल चांदनीने तो आपल्याला
नखशीकांत गोंजारतो.
सुख दुःखाची झुळूक
येतच असते जीवनात ,
म्हणून का जगण्याला
काही अर्थच नसतो .
चंद्रच तर आपल्याला शिकवतो
जगण्याचा खरा अर्थ ,
काळोख अन लक्ख प्रकाश
असेच का त्याचा जीवनात व्यर्थ .
ऱ्हासा नंतर वृद्धी अन वृद्धी नंतर ऱ्हास
हे जीवनाचे गुपित ,
हेच मानवाला समजवण्या साठीच
का तो अमावसेने शापित.
प्रतिपदेची :)  कोर
एक आशेचा किरण,
दुःखा नंतर सुखाला
चला करूया वरण ....... सुनिता
.....................................२७एप्रिल १४

Sachin01More


sweetsunita66