बदल...

Started by शिवाजी सांगळे, April 30, 2014, 12:13:00 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



बदल...

रात्र गर्द अंधारी, चंद्रालाही लागेल ग्रहण
सोडून तारकांना, ढगही वाट बदलतात !

बदलला रंग सावलीचा, कळलेच कसे नाहि
वळणावर वयाच्या, नेहमी रस्ते बदलतात !

तरंगताना होडीने, सोडून दयावा किनारा
वादळात वेळेच्या, नाती सुद्धा  बदलतात !

जीवन व्यवहार, माहित ना होईल कसा?
पावलो पावली मात्र, लोक शब्द बदलतात !

ठरवतो नेहमी, आठवू नये कधी तुला,
मिटल्यावर डोळे, मात्र विचार बदलतात !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९