मनामनातील दुवा (संवाद)

Started by pomadon, September 28, 2009, 02:02:54 PM

Previous topic - Next topic

pomadon


           मनामनातील दुवा (संवाद)
  माणसा-माणसामधल्या संवादाला फार महत्त्व असतं. विसंवादानं माणसांमधली नाती तुटतात. दुरावे निर्माण होतात. परंतु संवाद म्हणजे अतिसंवाद नव्हे. संवाद म्हणजे शब्दमाध्यमानं साधलेला मनामनातला दुवा असतो. एकमेकांना समजून घेण्याकरिता केलेला प्रयत्न असतो. सामंजस्य निर्माण करतो तो सुसंवाद.
  एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपलीच बाजू कशी बरोबर आणि दुसर्‍याची चूक असा यत्न करायचा नसतो; म्हणून नुसतं बोलून संवाद होत नाही. सामंजस्य निर्माण होत नाही असा प्रयत्न समजून अजु८न तुम्ही करायला हवा.
  आपल्या बोलण्यातून परस्परांविषयी गैरसमज अविश्वास आणि संशय निर्माण होतात. याच कारण आपल्याला काय बोलायचयं, आपलं स्वत:च म्हणणं काय आहे? हे तुमचं तुम्हाला समजत नाहीये. म्हणून आपण " ओव्हर कम्युनिकेट " करता स्पष्टं शब्दात सांगायचं तर तुमचं बोलणं, संवादात मोडत नाही तर वायफळ बडबड म्हणावी लागेल. आपल्याला जे बोलायचयं ते मोबाईलवरून आपण ' इन्स्टंट ' बोलून टाकतो आणि मग काय बोललो याचा विचार करतो. आधी विचार करा आणि मग बोला कदाचित आपण अमुक एक गोष्टं बोलायलाच नको असं वाटून आपण आपण गप्पा राहाल,ऐकून घ्याल, न बोलताही जवळीक साधाल.......!!!!!!!!!

shardul

I really enjoyed each post of yours in this section.

Khup mast posting ahet..keep it up

gaurig