मोबाईल

Started by शिवाजी सांगळे, May 01, 2014, 10:10:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोबाईल

आम्हाला तेव्हा, जर मोबाईलची सोय केली असती !
आम्ही सुद्धा, छान थोडीशी शायनिंग मारली असती !

मोबाईल हाती, आता आला मिसकॉल देऊ कुणाला?
म्हणता असं, मी जरा कुठे मिसेसचाच कॉल आला !

चार चौघात, चमकावं म्हणून झकास रिंगटोन ठेवली,
नसलेला कॉल, अटेंड करता रिंगटोन स्वतः केकाटली !

लिहावं काही, कीबोर्ड जमेना मेसेज पाठवायचा कसा?
झालेली पाहून, गंमत आमची दोस्तांनी घेतला हसा !

काहीही म्हणा, मोबाईल असणं चांगलीच सोय आहे,
छळणाऱ्या, लोकांना टाळायला मस्तच ऑप्शन आहे !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Sachin01 More

Durdeva tumch and sudaiv amch
Moregs