स्वर्ग...

Started by SONALI PATIL, May 02, 2014, 06:21:09 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

       स्वर्ग...


शिरच्छेद व्हावा दुखःचा,
भुतलावरी स्वर्ग वसावा.
सुर्य उदय व्हावा मानवतेचा,
अस्त नको कधी प्रकाशाचा.
       सतकर्माची व्हावी पेरणी,
       व्हावी सुखाची शेती येथे...
       आनंदाची यावी पिके लखडुनी,
प्रेमाच्या वाहव्या सरीता येथे,
नको दुखःचा डोह कुठे.
       गरीबी-श्रीमंतीची नको दरी.
       मानवतेचे वृक्ष यावे सदा बहरुनी.
तुरुंग व्हावा रिकामा सारा,
व्हावा चोरी लबाडीचा अस्त.
       मानसातला मानुस जागा व्हावा,
       स्ञी-पुरूषातला भेद मिटावा.
       भुतलावरी स्वर्ग वसावा.

Sameer Bhosale

Khup chan, mansparshi kavita aahe