मी एक शून्य !

Started by vaibhav joshi, May 02, 2014, 10:36:30 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

मी एक शून्य ... !
मी एक शून्य आहे ,
माझ्यामुळे काही आकड्यांना  किंमत  असेलही
पण माझे , हो हो अगदी स्वतःचे मूल्य , किंमत काय ?
मी एक शून्यआहे
वर वर बघता गोल पण आतून 'पोकळ ', रिकामे
काही आकड्यात मी मिसळला तरिहि
काहीच बदल होत नाही , त्या आकड्यातही अन माझ्यातही
मात्र काही आकड्यांना माझ्यातून  वजा केले तर
त्या बिचाऱ्या आकड्यांनाच 'उणेपण' येते
  काही आकड्यांना मी गुणले तरिहि ते नगण्यच गणले जातात
अपवाद फक्त एका क्रियेचा ...

कुठल्याही आकड्याला मी भागीतले तर त्यांचे मुल्य 'अनंत ', अमोलत्वाकडे जाते

... त्यामुळे आता फक्त भागाकार करूनच समोरच्या आकड्यांना आनंदाचे भाग भांडवल देणे मला  भाग आहे !

--वैभव वसंत जोशी , पुणे