#चांदणी रात#

Started by Sachin01 More, May 03, 2014, 06:46:14 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

चांदणी रात होती
दिव्यातली वात शांतच होती
अशा या अनोळख्या ठिकाणी
त्या दोघांची साथ होती
अशा या मोहक राती
तिच मन का हरवून जाते

ढगाच्या आडोशातून चंद्र पाहत होता
तिच्या रुपाकडे पाहून तोही लाजला
लाजून-बुजून तो झाडामागे लपला
चालता-चालता त्याच्या मार्गी तारा आला
चंद्राला विचारले,तुला आज राग का आला
स्वत:ला विसरुन तु का बर पळाला..?

#सचिन मोरे#
Moregs