# स्वप्न #

Started by Sachin01 More, May 03, 2014, 06:57:37 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

स्वप्न कस समुद्रासारख मोठ्ठ् पहाव,त्यात रमताना सगळ विसराव
स्वप्नात रंगून जाताना मनही त्यात हरवाव,आयुष्यात कधीतरी स्वप्न पहाव...

स्वप्न असाव उगवत्या सुर्यावाणी ,राबतोय तो दिवस-राञ अनवाणी
त्याच्या जगण्यात दिसत नाही त्याचा जीव ,इतरांच्या जीवाची थोडी येऊ द्या कीव

स्वप्न पहाव कस एकांत माळरानी ,वाटतय जग कस उगवत्या फुलावानी
जरी जीवन गेल कोलमडून,कधीतरी येईल कळी उमलून

कधीतरी दुसर्यासाठी स्वप्न पहाव,वर्तमानाला विसरुन भविष्यात रमाव
मागच्या चुका विसरुन नव बी पेराव झोपेच्या राज्यामध्ये छानसं स्वप्न पहाव.....

#सचिन मोरे#
Moregs