माहित नाही....

Started by शिवाजी सांगळे, May 04, 2014, 09:04:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माहित नाही ...

खूप बोलायचं असत
कधी तुला भेटल्यावर !

शब्दच सुचत नाहीत,
तेव्हा तुला पाहिल्यावर !

पहात रहाते नुसतीच,
अन साठवते डोळ्यात !

गुंतते रुपात तुझ्या,
पुन्हा पुन्हा भेटण्या पर्यंत !

दिवस, महिने, अन वर्षं,
किती काळ माहित नाही !

साठवून सुद्धा मनात तूला,
सय तूझी सोडवत नाही !

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९