डोळे

Started by SONALI PATIL, May 07, 2014, 11:54:46 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

                  डोळे


एक उंच झोका घ्यावा,मोकळा श्वास घेण्यासाठी.एक उंच झोका,स्वप्नांचा गंध डोळ्यात साठवून,
त्यांच्या पर्यंत पोहचंण्या साठी.हया डोळयांनी सगळ पाहीलेल असत,दुखःचे क्षण रडून काढलेले असतात,
आनंदाचे क्षण हसुन फुलवलेले असतात.कधी कधी दाबून ठेवलेल्या असतात,भाव-भावना मनात,
दूस-यांना ञास होवू नये म्हणून.
या डोळयांनी फक्त हसू दाखवलेल असत,त्या प्रत्येक क्षणी. एक अश्रु सुद्धा पूरत असतो,मन उकलण्या
साठी.या डोळ्यातून सगळ कस आरपार पाहता येत मानसाला.चांगुलपणा,क्रूरपणा,वासना हे सगळ पाहता
येत,फक्त या डोळ्यांनी.  याच डोळयांनी प्रेम फूलत.याच डोळ्यांनी मग मन मीळत. या डोळ्यांनी फक्त,
फूललेच बघाव.आनंदाचे सोहळे,मायेचे मळे....
पण अस कधी होत का १
त्याला कधी कधी, नको असलेल पण पाहाव लागत. मग अश्रूंनाच डोळ्याच सांत्वन कराव लागत.
उरात पेटलेली,चितेची आग,अशी आसंवानी कशी बूजायची.मग मन पेटून जात अन,अशांत वादळ
धूडघुस घालत.या पेटलेल्या चितेच्या ज्वाला,उभ आसंमत भस्म करतील की काय १ कश्या थांबतील,
या आसवांनी. ते आटून जातील पार....वाळवंट होईल या डोळ्यांचे.
एक मनात उमेद्द होती जगण्याची,आपल्या मायेच्या लोकांसाठी,प्रेमाच्या जिवाळ्याच्या पोराबाळांसाठी.
एक आशा होती,उद्याच्या उज्वल भविष्याची,आनंदाने एकोप्याने थाटा-माटात जगण्याची.
आणी अचानकच एखादे वावटळ येते, आणी क्षणात जीवन उध्वस्त करून, काहुर माजवते.
त्या छोट्याश्या आनंदाच्या किरनाला,काळे काळे ढग गिळून टाकतात एका क्षणात,आता फक्त राहतो तो
फक्त अंधारच अंधार....

               काय करतील हे डोळे आता १ काय पाहतील निरर्थक जीवन,त्याला कधीच उजेडाचा
स्पर्श नाही का होनार १  या डोळ्यानां आता फक्त ऐकावच लागेल तो कोलाहल. काहुर बनून नाचेल तो
उरामध्ये,मग डोळे उघडे काय१ आणी मिटले काय१ म्हणून एक उंच झोका शेवटचा डोळे मिटण्या आधी....