तुझ्या बरोबर एक दिवस...

Started by Ankush S. Navghare, Palghar, May 10, 2014, 09:57:58 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

खुप आस आहे
माझ्या वेडया मनाची
फ़क्त एक दिवस तुझा
हीच आस जीवनाची
खुप बोलायचय तुझ्याशी
हातात हात घेउन
खुप काही सांगायचय
खांद्यावर डोक ठेउन
तो आनंद माझ्यासाठी
काहीतरी औरच असेल
जेव्हा तू माझ्या आणि
मी तुझ्या जवळ बसेन
पाहिन तुझ्या डोळ्यांत
स्वताला विसरून
अस्तित्वच नसेल माझे
जाईन तुझ्यात हरवून...
जाईन तुझ्यात हरवून...

.... अंकुश
(स्वलिखित)
दि 7/05/2014
11:39 Am