वंचनेच्या दुखाःत मी (गझल)

Started by श्री. प्रकाश साळवी, May 13, 2014, 12:41:52 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

चार भिंतीतल्या तुरुंगात कोंडिले मी स्वतःला
वंचनेच्या दुखाःत मी जाळिले स्वतःला

राहणारी बरोबर माझ्या वंचना पण स्वतःची
गाणारे मज साथ पण मी टाळीले स्वतःला

गगनात विहरणारे क्रौंच - आकाशपक्षी
मोकळ्या विवंचनेत मी पाळिले स्वतःला

भरलेले विश्व सारे,  सारे माझेच मी   
गराड्यात माणसांच्या मी गाळिले स्वतःला

नाचले थवेच्या थवे येथे पक्षीगणांचे
विवंचनेच्या मोगऱ्यात मी माळिले स्वतःला

वेडाच मात्र मीच होतो सारे इथे शहाणे
वेदनेच्या निखाऱ्यात मी पोळीले स्वतःला

श्री. प्रकाश साळवी दि. १३ मे २०१४.     


शिवाजी सांगळे

भरलेले विश्व सारे,  सारे माझेच मी   
गराड्यात माणसांच्या मी गाळिले स्वतःला "

Prakashji farch sunder gazel.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९