ईमानदारी विकायची मला....

Started by SONALI PATIL, May 13, 2014, 07:02:07 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

आज पण समाजात कही चागंले लोक आहेत.त्या मूळे देशात ईमानदारी व मानुसकी जिवंत आहे.मला ईथे कूनालाही दुखःवायचे नाही.किंवा कुनावरही टिका करण्याचा ऊद्देश नाही. समाजात फोफावणा-या भ्रष्टाचारी राक्षसा ची भीती वाटते.
प्रत्येक ईमानदार व देशप्रेमीला माझा मानाचा सलाम.





ईमानदारी विकायची मला....

खेडयातले दोन मिञ असतात. एकाच वर्गातले,गरीबी परिस्थीतीत वाढलेले असतात.दोघानांपण गरीबी चे चटके बसलेले,म्हणून त्यानां पैशाची खुप कदर असते.शिवा हुशार होता,त्याचा वर्गात नेहमी पहीला नबंर येत असे.त्याच्याकडे वहया पुस्तके आनण्यासाठी व फी भरण्यासाठी पण पैसे मुबलक नव्हते.शाळा सुटल्यावर ते हॉटेल मध्ये वेटरचे काम करत,व सकाळी सकाळी वर्तमान पेपर घरोघरी वाटत.
नाम्या शिक्षनात जेमतेम होता. पास होने हेच त्याचे ध्येय. दोघाना पण शिकुन घरादाराची जीम्मेदारी संभाळायची होती.
           शिवा तत्ववादी विचारांचा होता,प्रामानीक व सत्याला धरून चालनारा. नामाचे सगळे शिवाच्या उलटे होते.दोघे पण उच्च शिक्षन घेऊन नौकरीच्या शोधात स्पर्धा परीक्षा देत होते.नाम्याने नौकरीसाठी शेती विकुन टाकली व प्रत्येक गोष्ट मॅनेज करून कशी बशी नौकरी मिळवली.त्याला शाषकीय पदावर चागंल्या हुद्दयावर नौकरी व चागंली पोष्टीगं मीळाली.नाम्याचा आनंद गगनात मावत नव्हता,त्याला नौकरी लागताच चागंली बायको पण मीळाली .
पण शिवा चे काय १ तो अजुन बेकार हीडंत होता. त्याला घरच्यांचा बोचन्या व नाम्याचे उदाहरन सारखे सगळे देऊ लागले.शिवाला कशीतरी दोन वर्षानंतर नौकरी मिळाली,नाम्या सारखीच त्याच हुद्यावर, शासकीय सेवेत शिवा रूजु झाला,कसलाही पै अडका न देता.त्याला पोष्टींग माञ खुप अडचनीच्या ठिकानी
मिळाली, तरी शिवा समाधानी होता. कारण त्यानी त्याच्या शिक्षनाच्या व य़ोग्य तेच्या जोरावर नौकरी मिळाली होती.आता त्याचे लग्न ठरले व त्याने लग्नाला सर्व मिञानां बोलावले,नाम्या आपला मस्त  नौकरीत रंगलेला असतो.चागंल्या ठिकानी पोष्टीगं घेऊन झपाझप पैसे वसुल करने चालु असते.सगळ्या
गोष्टी मॅनेज करने त्याला चागंले जमलेले असते. तो शिवाच्या लग्नाला येतो,तो मोठया सफारी अलीशान गाडी मध्ये,सुट बूट घालून साहेब दिमाखात लग्न मंडपात प्रवेश करतात.त्याच्या बायकोचा पण तेवढाच रूबाब,सोन्या-नाण्यांनी मडवीलेले होते तीला.गावातील लोक तोंडात बोट घालुन बघत राहतात.सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच असतात. बिचारे नवरा नवरी राहतात बजुला व सगळे त्याच्या आवतीभोवती आवोभगत करू लागतात.
         शिवा चा नवीन संसार चागंला सुरू होतो. त्याची सहचारीनी पण त्याला सुख दुखःत सभांळुन घेते ,ती खुप समाधानी असते.ती शिवाच्या स्वभावाला साजेशी असते,शिवाला घरी सुख असते पण नौकरीमध्ये फार ञास होतो.त्याच्या प्रामानीक पणामुळे,काही वरीष्ट ञास देऊ लागतात. देने घेने हे त्याच्या नौकरीतला सगळ्यात मोठा अडथळा बनतो.ज्याने कधी दारूला हात नसतो लावलेला तो काय त्यांची सोय करणार १
                जिथे नाम्या दहा-बारा वर्षे टिकुन राहतो तिथे शिवाची दोन-तिन वर्षात उचल बागंडी (बदली) होवू लागली. शिवा ची पोष्टींग ज्या ठिकानी होणार तीथे दहशत माजु लागली. नाम्या माञ साहेबाची हुजूरगीरी करत होता,सारखे उटता बसता जी सर,जी सर चालायचे.प्रत्येक नविन येना-या साहेबांचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना माहागाडे गिफ्ट देने,अलीशान हॉटेल मध्ये जेवायला घेवून जाने.
घरी काही तरी निमीत्त काडून सत्यनारायनाची पुजा,मुलाचा वाढदिवस, असे निमीत्त करून साहेब लोकांना
खुष करून टाके. कधी कधी तर खुप ईमानदार  साहेबांना सुद्धा त्याची भुरळ पडू लागली,व तो सगळ्याचांच लाडका झाला. त्याला प्रत्येक वर्षी बक्षीसांचा वर्षाव होवू लागला.
            ईकडे काय शिवा चा प्रामानीक पणा नडत गेला,त्याला बक्षीस तर द्या सोडून ,त्याला नौकरी करने मुश्कील झाले होते. कही तरी कारनावरून त्याला पनिशमेंट मिळू लागली. देशभक्ती, ईमानदारी,परोपकार हयाला काहीही किम्मत नसते ,असे शिवाला वाटून आतल्या आत ईमानदारी बोचू लागली.
ईकडे नाम्या चे दोन चार बंगले, गाड्या,बॅंक बॅलंस वाढत होते,व त्याला सर्वोतकृष्ट अधीकारी म्हणुन,राज्य शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता. त्याची सगळी कडे वाह वाह होती.स्तुती सुमने ऊधळली जात होती.
                शिवाच्या विचारांची,ईमानदारीची पार चाळनी-चाळनी झाली होती.तो रोज देवाला
म्हणत, हे न्याय देवता तु कंसाचा,भस्मासुराचा,कौरवांचा वध न्याया साठी सत्याच्या विजया साठी केलास.
मग माझ्याच का  ईमानदारी ची परिक्षा घेतोस १
         शेवटी काय होते सत्याचा विजय होतच असतो. लबाडीचा मूखोटा उतरतो व पापाचा घडा भरताच, पापी भ्रष्ट लोकांना शिक्षा होते. शिवा सकाळी सकाळी ऊठुन वर्तमान पेपर हातात घेऊन वाचतो, व ऐकदम चमकतो,त्यात मोठया अक्षरा मध्ये हेड न्युज ,नाम्याला  एँटीकरप्शन ब्युरो ने रंगे हाथ
पंन्नास हजाराची लाच घेताना पकडलेले असते.व त्याला मिळालेले शासनाचे बक्षीस पण परत घेतले जानार होते.
शेवटी सत्य मेव जयते. चोर हा जास्त दिवस लपला जात नाही,ऊशीरा का होईना त्याचा खरा मुखोटा उतरला जातो.शिवा सारख्या लोकांना ईमानदारी विकायची बारी येत नाही.

सर्व प्रामानीक,ईमानदार लोकांना माझा मानाचा मुजरा.
जय हिंद,जय महाराष्ट़्.