रानामंदी

Started by शिवाजी सांगळे, May 13, 2014, 11:37:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




रितेपण आलया ठार, भरल्या आभाळाला,
आतुरलीया लई धरणी, दवाच्या पाण्याला !

यायचा कवा ढाळ, कोरडया आभाळाला ?
कवा यायचा पूर तो, दवाच्या पावसाला ?

कोराडली धरती, सारं सुकलंया शिवार,
घाम पितिया धरणी, बळीराजा हा बेजार !

फांदिला झाडावर, कसलाच कोंब नाहि,
ढेकळाला रानामंदी , गवताचं पात नाहि !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

प्रकाश साळवी

श्री. शिवाजी सांगळे आपल्या कविता खूप सुंदर आहेत. सर्व कविता वाचल्या खूपच छान आहेत. असेच लिहित राहा. धन्यवाद

शिवाजी सांगळे

नमस्कार, साळ्वीजी आपल्या अभिप्रायाबद्धल धन्यवाद. आपणही बदलापूरात रहाता, मी पण वेळ असल्यास भेटावे म्हणतो.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९