setting

Started by niteshk, May 15, 2014, 07:45:40 PM

Previous topic - Next topic

niteshk

Setting
5 garden मधे फिरत होतो रमत गमत
नजर मुलींवर आणि हातात चेतन भगत

भिरभिरणारी नजर शेवटी एकीवर टिकली
कारण bench वर ती एकटीच होती बसली

bench चा कोपरा जणू तिनं विकत घेतला होता
तिला कळण्या आधीच मी दूसरा पटकावला होता
                               
मला शेजारी बघून तशी ती जराशी बिथरली
मी पण दुर्लक्ष करुन पुस्तकाची पाने चाळली

काहीतरी notice व्हावं म्हणून पुस्तक बाजूला ठेवलं
पण एवढ्याश्या गोष्टीनेच माझं काम भागलं

"wow...!! चेतन भगऽऽत" असा आवाज तिने काढला
जणू माझ्याजागी तिला साक्षात चेतन भगत दिसला

मग गप्पा अश्या रंगल्या सगळे विषय संपून गेले
पुन्हा भेट व्हावी म्हणून माझे भगत तिला दिले
                                         
अंधारात सोडलेल्या बाणाने अचूक निशाणा साधला
अन् नकळत सुरू झालेला खेळ प्रेमाच्या मार्गी लागला
                         
बहुतेक आमची तार आधीच जुळलेली होती
अशाप्रकारे माझी पहिली setting जमली होती

salim

Jhakaassss.....

Lai Bahri...

Akshoo

Waaahh...!
Farach chhan..!

mane priyanka

Jhakkas..setting...! :-*

niteshk

Thnx Priyanka...!

Mayur Jadhav