सख्या आठवनीत तुझ्या....

Started by SONALI PATIL, May 18, 2014, 10:18:14 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

        सख्या आठवनीत तुझ्या....



पोर्णिमेची आज रात,चंद्र लपला कुठे ढगा आड ।
मंद वा-यात घूमतो प्रितीचा नांद ।।
हे बंध रेशमाचे प्रेम ऋनानूबंध ।
तुझ्या प्रितीचा घातला मी गळ्यामध्ये चंद्र हार ।।
कधी ऊमलली डोळयातूनी रे दोन कमलपुष्प ।
नक्षञांचा सडा शिंपीला मी ह्रदयात ।।
अश्रूसंगे सांडतो,ह्रदयातूनी रे विरह थेबं थेबं...
आठवनीत तूझ्या काढली,मी रात रात जागून ।
एक एक चांदनी वेचली रे मी पदरात ।।
रात रात जागुनी काढली तुझ्या विरहात ।
दूर देशी कूठे तू रे,का माझ्या नजरे आड ।।
पहा तु दूरूनी,मुख चंद्रमात ।
अंतरातूनी पाहूनी चंद्र, शोधीले मी ह्रदयनाथ ।
शुक्र तारा मंद हसूनी,का पाहतो आपला रे अंत ।।
सख्या माझीच मी न राहीले रे ,
श्वास दूर देशी तुझ्या ह्रदयात ।
मंद वा-याने सुगंध दरवळला आज ।।
सख्या आठवनीत तुझ्या काढली मी रात रात जागुन ।
एक एक चादंनी वेचली रे माझ्या पदरात ।।
नक्षञांचा सडा पडला,आज माझ्या ह्रदयात ।
पोर्णिमेची आज रात, कूठे लपला चंद्र ढगा आड ।।
क्षनात संपूनी अतंर,उडत यावे मंद सुगंध वा-या समवेत..।
प्रितीचा लावूनी टिलक माथी,ओवाळूनी टाकेल पंचप्राण ।।
सख्या आठवनीत तूझ्या रे, मी काढीली रात रात जागून...।

               
                    .

NARAYAN MAHALE KHAROLA