हुंदका...

Started by शिवाजी सांगळे, May 18, 2014, 05:27:11 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तू एक अनामिक,
शोधताना तुला थकले रे....
होणाऱ्या प्रत्येक भेटीत,
सतत जाणिव करून देतोस...
मी, मझ्या पुरता,
तू... तुझ्या पुरती !
तरीही, प्रेम केलस,
जीवनावरील प्रेमापेक्षा जास्त !
उलगडताना तुला...
स्वत:च गुरफटून गेले रे...
त्या, त्या वेळी,
तू नाहीस अस वाटत होतं,
पण माफ कर, माझचं चुकल,
विश्वास काय?
हे तूच सागीतलस,
क्षणभर प्रेमापेक्षा...
अनंताची मैत्री कर,
अस म्हणालास !
तेंव्हां वाटल, अरे...
वेडा कि काय तू?
पण आज कळल...
तुला मी कधीच
समजून घेतलं नाहि,
वाईटहि मानलं नाहि,
कारण...
तू एक अनामिक



© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सुमित्रा

क्षणभर प्रेमापेक्षा...
अनंताची मैत्री कर,
अस म्हणालास !

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

कोणत्यातरी "स्वामी"चा
ऐकून "उपदेश" तो
पोपटपंची केली होती "त्याने" ती 

---------------------------

कोणत्यातरी "मुला"बद्दल वा "मुली"बद्दल
वाटलेले काही काळ "उत्कट प्रेम"
हा तारुण्याचा नैसर्गिक प्रभाव
अनादि-अनंत चिरंतन आहे!