"आता काहीच कळेना मला.....

Started by Lyrics Swapnil Chatge, May 20, 2014, 10:50:27 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

आता काहीच कळेना मला,
जेंव्‍हा नयानाने पाहिलं तुला...
अन् नजरेच्‍या पहिल्‍या भेटीत,
जीव माझा वेडा गुंतला...

तुझ्या डोळ्याची हया पाहुनी,
मन हा वेडा वेडा झाला...
अन् तुझ्या प्रेमाच्‍या पावसात,
आज तोही चिंब भिजूनी गेला...

आता तुझी वेडी आस,
लागलीय माझ्या या उरास,
अन् तुला आपलसं करायच,
हाच धरला शेवटचा ध्‍यास...

तो इतका वेडा झालाय की,
त्‍यालाही भान राहिले नाही...
आज तो उघडया डोळयानेही,
फक्‍त तुझेच स्‍वप्‍न पाहत राही....

आता सहन होत नाही,
दुरावा हा आपल्‍या दोघातला...
वाटतं भेटूनी सांगावं तुला,
अबोल भावना माझ्या मनातल्‍या

--------------- ----------------
@ स्‍वप्‍नील चटगे
(दि. 18/05/2014)

सुमित्रा

कोणत्यातरी "मुली"बद्दल (वा "मुला"बद्दल)
वाटलेल्या "उत्कट प्रेमा"च्या
स्वप्नात रंगून जाणे काही काळ
आणि "आता सहन होत नाही,
दुरावा हा आपल्‍या दोघातला"
असे वाटणे त्या काळात
हा तारुण्याचा नैसर्गिक प्रभाव
अनादि-अनंत चिरंतन आहे!