जगावे कसे-जगावे असे

Started by श्री. प्रकाश साळवी, May 20, 2014, 03:07:33 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

जगावे कसे, जगावे असे,
परी जगावे माणूस जसे,

फुलावे असे, झुलावे असे,
असे आकाशीचे खग जसे,

तरावे कसे, उरावे कसे,
जलात पोहणारे मिन जसे,

झुरावे कसे, तुळावे कसे,
दिव्यात जळण्या पतंगा जसे,

फिरावे कसे, मुरावे कसे,
नभी विहरणारे विहग जसे,

श्री.प्रकाश साळवी दि. २० मे २०१४.
(सदर "गझल" पादाकुलक वृत्तातली असून तिच्या १६ मात्रा आहेत. हा एक प्रयत्न आहे. जाणकारांनी कृपया मदद  करावी.)
https://www.prakashsalvi1.blogspot.in