कविते बद्दल

Started by विक्रांत, May 20, 2014, 08:00:36 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

आम्हा वाटते आम्ही लिहितो 
शब्द काव्य महान प्रसवतो 
खरच सांगतो मित्रा तुजला 
लिह्णारे ते आम्ही नसतो
ही तो कृपा सरस्वतीची 
जगत्रयातील चैतन्याची 
कळसुत्रा मग तमा कशाची 
स्तुतीची वा त्या टीकेची .
जया आवडे त्यांनी घ्यावे
नको त्यांनी नाकारावे
ज्ञात अज्ञात शब्द सरिता
तिने आपुले वाहत राहावे .
शब्द पहिला कुणी सृजला
शब्द नवा का तयार झाला
अगणित वृक्ष लता सुमने
अनंत रुपी वसंत न्हाला
 
विक्रांत प्रभाकर