वि. दा. सावरकर

Started by विक्रांत, May 21, 2014, 07:37:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


त्या शब्दांचे ऋण माझ्यावर
ते नाव असे मम हृदयावर
ते दृढ अमर विजयी विचार
देती मम आस्तित्वा आधार

ते जळले रक्त जड कोलूवर
ते अडले अश्रू ह्र्दतटबंदीवर
ती भव्य स्वप्ने त्या भिंतीवर
ती चित सरिता उमटे मनावर

ते नाव एकच वि दा सावरकर
कळले त्यालाच फक्त कळणार
दुर्बुद्धी दुर्भाग्यी पूर्वगृहीत येर
कुपमंडूक व्यर्थ बरबटले खरोखर
 

विक्रांत प्रभाकर