जेव्हा कोणी

Started by Sachin01 More, May 23, 2014, 01:56:19 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

जेव्हा कोणी

जीवन तेव्हा खूप छान वाटत
जेव्हा कोणी आपलस वाटत
कारण नसताना हसत राहत
आपल मन लहान मुलासारख खेळत राहत

हसण कोणाचे जेव्हा मनात बसत
तिच रडण पाहुन मन हरवून जातं
सोबतीत तिच्या गीत गातं
नसेल सोबत तरी मन तिच्यातच रमत

दिसणे कधीतरी तिच डोळ्यातच खुपत
नाही दिसली तर मनही रुसत
डोळ्याच संभाषण कधी छानस वाटत
दुखावल तिला कधी तर डोळ्यातुन पाणी येत

बोलणे कोणाचे जेव्हा काळजात घुसते
ऐकूण काही हे वेडे मन जेव्हा हसते
हसण माझ पाहून जेव्हा तीपण हसते
तेव्हा तिच बोलण खूप छान वाटत.
Sachin