कोरा कागद...

Started by शिवाजी सांगळे, May 25, 2014, 03:17:26 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



कोरा कागद...

कल्लोळ शब्दांचा मनात
विचारांचा बाजार होतो,
ठरवून सुद्धा खूप काही
दिवस वांझ होतो !

कधी कधी एकएक दिवस
असाच वाया जातो,
लिहायला घेऊनही कागद
कोराच का रहातो !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९