मनातले शब्द मनातच राहून गेले...

Started by Prasad.Patil01, May 28, 2014, 06:11:26 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

फक्त एकदा तुला डोळे भरून पाहायचे आहे,
तहानलेल्या डोळ्यांना तुप्त करून द्यायचे आहे...

जे शब्द ओठांवर रेंगाळत होते आजवर,
ते विसरण्याआधीच व्यक्त करून द्यायचे आहे.
फक्त एकदा तुला डोळे भरून पाहायचे आहे...

दोन्ही हातांच्या ओंजळीत तुझा चेहरा घेऊन,
माझ्या ओठांचा स्पर्श तुझ्या ओठांना द्यायचा आहे...
फक्त एकदा तुला डोळे भरून पाहायचे आहे...

देहभान विसरून तुला कवेत घेऊन,
माझ्या प्रेमाच्या रंगात तुला न्हाहून द्यायचं आहे...
फक्त एकदा तुला डोळे भरून पाहायचे आहे...

प्रेमरूपी विश्वात एकदातरी विहारून,
माझ्या प्रेमाची जाणीवही तुला करून द्यायची आहे,
फक्त एकदा तुला डोळे भरून पाहायचे आहे..


Prasad.Patil01


Kalubhagat123@gmail.com

Manatale bolanyasathi kharch khup himmat lagte,
Khup chhan ashi prasad patil yanchi kavita

tanuja dhere

*****माणसाच्या जत्रेत******
आयुष्याचा दुकानात,
माणसाच्या जत्रेत
माणसाची गर्दी झाली खुप,
हरवला श्वास, हरवले मन,
हरवले सुख.....
कोणी शोधेल का कुठल्या
दुकानात विकत मिळेल हो सुख?
कोणी विकत घेईल का हो दुःख?
आयुष्याचा दुकानात
सुख विकत घ्यायला 
माणसांची गर्दी झाली खुप
सुखाबरोबर एक मोकळा
श्वास मिळेल का हो विकत?
एक क्षण झाडाखाली मायेची सावली मिळेल का हो विकत?
आयुष्याचा दुकानात
माणसाची गर्दी झाली खुप
कोणी शोधेल का कुठल्या दुकानात
सुखाची झोप मिळेल हो विकत?
कोणी विकत घेईल का हो दुःख?
विकत घेता येतील माणसे ?
विकत मिळतील आई बाप ?
पण जन्मदात्या आईबापाचं
काळीज विकत घेता येईल का कुठं?
पोटच्या लेकराला आयुष्यातील
सर्व सुखं मिळावी या
विचारात रातदिस जगणारं
मन मिळेल का हो विकत कुठं?
साताजन्माचं पुण्य देऊनही
मिळणार नाही कुठं ?
मिळणार नाही कुठं ?
*********'तनुजा ढेरे************