"अब की बार मोदी सरकार" / "अच्छे दिन आनेवाले है" वगैरे ठीक आहे पण -

Started by madhura, May 31, 2014, 10:34:16 AM

Previous topic - Next topic

madhura


प्रिय मित्रांनो,
"अब की बार मोदी सरकार" / "अच्छे दिन आनेवाले है" वगैरे ठीक आहे पण -
१) ट्रॅफिक सिग्नल ला लाल दिवा लागला तर आपण थांबणार आहोत का ?
२) पायी चालणा-या लोकांनाआधी रस्ता ओलांडू देणार आहोत का ?
३) रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी चालवणार आहोत काय ?
४) अनुज्ञप्ति (Licence) किंवा पारपत्र (Passport) आणि इतर सरकारी कामांसाठी लाच देणे बंद करणार आहोत का ?
५) सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत का ?
६) व्यापारी लोक "इन्कम टॅक्स व इतर सर्व टॅक्स" प्रामाणिक पणे भरणार आहेत का ?
७) घर घेताना ब्लॅक आणि व्हाईट चा विचार करणे थांबावणार आहोत काय ?
८) अपघात ग्रस्त लोकाना मदत करणार आहोत का ?
९) मुलींची भ्रुण-हत्या थांबवणार आहोत का ?
१०) नदी मधे निर्माल्य व इतर कचरा फेकणे बंद करणार आहोत का ?
११) कचरा कुठे ही फेकणे बंद करणार आहोत का ?
...
...
...
आणखी बरेच काही ! ! !
वाचणा-या प्रत्येकाने वरील यादी मधील एखादा तरी गुन्हा / भ्रष्टाचार केला असेल (ट्रॅफिक बाबतीत रोज करत असतील !).
ह्या आणि अशा ब-याच छोट्या-छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण प्रत्येकाने जर अंगी बाणवल्या नाहीत तर कुठलेही सरकार आले तरीही आपण "जैसे थे" च राहू आणि कोणतेही सरकार आपल्याला वाचवू शकणार नाही. मतदारांनी स्थिर सरकार आणून एक कर्तव्य पार पाडले आहे. पण ह्याचा अर्थ बाकीची कर्तव्ये पार न पाडता "अच्छे दिन" ची वाट बघणे मूर्खपणाचे ठरेल.
विचार करा आणि कृती करा !!


या वर उपाय काय ?


२४ तासांचे विभाजन -
८ तास झोप,
१ तास स्वतःचे अवरणे,
९ ते १२ तास नौकरी / व्यवसाय,
३ तास मैत्रिण / मित्रमंडळी / फोन / व्यायामशाळा (Gym) / सिनेमे / Facebook / WhatsApp ई.,
२ तास कुटूंबासाठी...
...
...
आणि मग देशाला वेळ देण्यासाठी आपण थोडे मागे पडतो !
अगदी हातात बंदूक घेऊनच सीमेवर जावं अस काहीच नाही ! ! !
फक्त ह्या व्यस्त वेळीपत्रकातील १५ मिनिटे पुरे आहेत ! ! !


ते कसे काय?


१) सर्व सिग्नल / वाहतुकीचे नियम पाळणे : ६-८ मिनिटे (तुम्ही थांबल्यावर आजू बाजूचे ४-५ जणं लाजे खातर थांबतातच)
२) ओला व सुका कचरा वेगळा-वेगळा करुन टाकणे - २ मिनिट
३) रस्त्यावर कचरा न टाकता कचरा पेटीतच जाऊन टाकणे : १ मिनिट
४) Facebook / WhatsApp वर लोकांमधे चांगले जनजागृतिचे सदेंश पोहोचवणे - १ मिनिट
५) रस्त्यावर न थूंकणे - ० मिनीट
६) शक्यतो स्वदेशी वस्तुच वापरणे - ० मिनिट


हे सर्व केल्यामुळे आपोआपच देश स्वच्छ राहील आणि फायदा पण होईल...
तरीही अजुन ३ मिनिटे शिल्लक आहेत आपल्याकडे...


अजून काय बरं करता येईल ?

Bhushan Kasar

Madhura Madam - Lekh Kharach chhan aahe aani aata tar mi krutihi suruch keli aahe aani sarvach lok kartil ashi aasha aapan manuya.