निसर्ग चक्र...

Started by SONALI PATIL, June 01, 2014, 10:48:49 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

निसर्ग चक्र...

झाडाच कामच असत,फूलायच,फळायच, लखडून जायच
फूलांनी,फळानी,पाणांनी दूस-याच्यां सुख दूखःत
ऊभ राहायच बनुन सावली.
सगळेच झाडावर टिकतातच असे नाही.पण काही टीकतात घट्ट वादळात सुद्धा,
तर काही  निराशेने झडतात,आणी कोमेजून जातात. काही फुलायच्या आतच झडतात,
तर काही फुलतात सुगंध देऊन दूस-यांन साठी. उगीच काही झुरतात उद्याच्या
फळाच्या अपेक्षेने. फुलनारे फूलतात पण ते,सूकतातच ना कधीना कधी १
फुलल्याचा  आनंद घेऊन मनी, साठवुन सुखाचे क्षण ह्रदयातूनी, ठेऊन जपून त्या
आठवनी, जावे पुन्हा दुखःच्या काळात सुखावूनी.
उद्याच्या नविन आशेने. सगळ्याच्या नशिबी नसते,फळायचे आणी फुलायचे
असतात लाखातून एक नशिबवान ,कळी पासून फळा पर्यंतचा करतात प्रवास.
त्याग ,सुख दूखःचे नाते,भावना फळातून येतात एकेदिवशी घेवून मधूर गोडवा .

                                  सोनाली पाटील.