की फक्त मला मित्र मानतेस ???

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., June 03, 2014, 07:15:34 PM

Previous topic - Next topic
की फक्त मला मित्र मानतेस ???

मला रोज येता जाता पाहून,
गोड गोड हसतेस,
मी एकटक पाहीलं की,
लाजेने लालबुंद होतेस.....

न चुकता देवाकडे,
माझं सुखी आयुष्य मागतेस,
न हुकता चतुर्थीला,
बाप्पाचा उपवास करतेस.....

माझ्यासाठी नेहमी,
स्वतःच मन मारतेस,
मी विचारलं तर,
नाही म्हणुन उत्तर देतेस.....

माझ्याशी एक क्षण बोलण्याचा,
रोज नवा बहाणा शोधतेस,
ओठांनी नाही म्हणुन ही,
डोळ्यांनी होकार कळवतेस.....

खरच कळत नाही मला,
का तू असं वागतेस,
तुझं प्रेम तर आहे ना माझ्यावर,
की फक्त मला मित्र मानतेस ???
[♥]  :-* [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०३/०६/२०१४...
सांयकाळी ०७:०६...
©सुरेश सोनावणे.....

वृंदा

आशुक तू, ना माशुक मी परी
न खरी मी, आहे केवळ नखरी