अभंग शंकराचा

Started by SONALI PATIL, June 04, 2014, 08:48:28 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

         अभंग शंकराचा

कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।।धृ।।
ह्या जगण्याचा,ह्या देहाचा
अर्थ कळाला आज मला...
हे कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।।१।।
कना कना मध्ये रूप तुझे रे निर्गुन-निर्वीकार,
ह्या जगण्याचे गूढ उकलले,
ह्रदया ह्रदया मध्ये शिव आहे ।
कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।।२।।
गूढ समजले जन्म मृत्यूचे,
कर्म बंधनाचे फेरे चुकविले ।
संसारामध्ये अडकले मी रे,
बाहेर ह्यातून मला काढ रे ।
कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।। ३।।
तुझ्या भक्तीची मी आसूसले,
कैलासाला मला ने रे ।
पुजा बांधली मी ह्या देहाची,
नयन माझे झाले ज्योती ।
अश्रुंचा हा अभिषेक तुला...
जिव माझा शिव झाला ।
कैलासाच्या महादेवा आज मला तुम्ही घेवून चला ।
हे कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।। ४ ।।
चिज व्हावे या देहाचे,
माझ्या चितेचे भस्म लाव रे ।
माझ्या ह्रदयाची फुले,
तुझ्या पुजेची शोभा होऊ दे ।
कैलासाच्या महादेवा हेच मागने आज तुला ।
संसारा मध्ये अडकले मी रे,
बाहेर यातून मला काढ रे ।
कैलासाच्या महादेवा हेच मागने आज तुला ।
कैलासाच्या महादेवा, अर्धनारी नटेश्वरा ।।५।।


सोनाली पाटील