आम्ही आमचीच माती केली ..

Started by Çhèx Thakare, June 05, 2014, 09:54:24 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

आम्ही आमचीच माती केली ..
.

जळणारा सुर्य
होरपळणारी जमीन
चालणारी पाऊले माझी
शोधत होती पाणी
.
भेटत नव्हती सावली
त्यात
घामाने भिजलेल पुर्ण अंग
पायही थकले होते
त्यामुळ झाले होते ते संथ
.
ऊन डोक्यावर
त्यात
जमीन तापलेली होती
पाय जळून चालले होते
पण त्यांची राख होत नव्हती
.
तेवढ्यात कोठून तरी एक ..
.
तेवढ्यात कोठून तरी एक
झाड माझ्या समोर येतं
सावली अंगावर घेण्याच माझ
तेव्हा स्वप्न पुर्ण होतं
.
घेतो विसावा मी तेव्हा
स्वर्ग भासतो तेव्हा मला
घेऊन गार सावली अंगावर
सुखी मानतो मी स्वत:ला
.
तेव्हा
मनात प्रश्न एक येतो
तेव्हा मनात एक प्रश्न येतो
कि आपण काय करत चाल्लोय
ज्याच्यावर जगत आलो आपण
हल्ली त्यालाच मारत चाल्लोय
.
बांधून सिमीटांची जंगले
आम्ही आमचीच गोची केली
तोडून झाडांची ती जंगले
आम्ही आमचीच माती केली
.
तोडून झाडांची ती जंगले
आम्ही आमचीच माती केली
.
©  Çhex Thakare