गावाकडचा पाऊस

Started by Sachin01 More, June 05, 2014, 03:02:15 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

शहरातल्या खिडकीतुन चमकणार्या थेंबापेक्षा
शेतामधला पाऊस वेगळाच वाटतो
काचांतून आवडणारा पाऊस
पीक शेतात असताना वैरीच वाटतो
पावसात भिजण्याचा आनंद
आम्हाला कधी समजतच नसतो
भर पावसात चालताना
पाय चिखलात फसुनच बसतो
जोरात चालण्याच्या नादात
पायातला बुटही नकोसा वाटतो
पायातला जोड कधी हातातच येतो
पावसाच्या पाण्याची गोडीच वेगळी वाटते
शहराच्या हवामान खात्यापेक्षा
पावसाची तिव्रता चिखलातूनच समजते
पावसानेच गावाकडची जिंदगी बहरते
पावसाच्या पाण्याने येतो मातीलाही सुगंध
पावसाशिवाय गावाकडचे काम सगळे बंद
पावसाच्या पाण्यानेच आहे शेतीची माया
पावसानेच हिरवीगार होते धरतीची काया..............
-S.S.More
Moregs

Ganesh vyavahare


Sachin01 More

Moregs