द्रौपदी

Started by sudhanwa, June 07, 2014, 12:19:09 PM

Previous topic - Next topic

sudhanwa

नरकाच्या दारात जेव्हा, अर्जुनावर जीव ओवाळून टाकणारी द्रौपदी उभी होती, तेव्हाची तिची मनःस्थिती मांडण्याचा हा एक प्रयत्न ( महाभारताच्या अभ्यासूकांना खासकरून )


कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

निष्णात धर्नुधर, तुझी त्रिलोकांत ख्याति
एकलव्य अंगठ्यास मुकला, हि कुठली निती?
दोन हात करण्यास, तुला का भिती?
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

मत्स्यभेद केलास तू, प्रेम माझे जिंकलास तू
अर्धांगिनी होईन तुझी, स्वप्न माझे
पाच पांडवांनी उपभोगिले तन माझे
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

थोरला बंधू तुझा,द्यूतात मज कसा हारला?
विचार त्या पराजिता, हक्क त्याला कोणी दिला?
स्तब्ध कसा तू राहीला, धनुष्य तुझे असमर्थ का?
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

वस्त्रं हरली माझी, भरसभेत
बृहन्नडा तू सत्य हेच
षंढ असा तू का जाहला
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

रामसेतूची थट्टा तुला, गर्व तुजला कसा बाधला
राम असमर्थ का वाटला, हनुमानासही तू भिडला
मध्यस्थी कृष्ण नसता जर, यमसदनी तू असता तर
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

सूतपुत्र म्हणूनी हिणविला मी तो मर्द
धन्य वृशाली जिचा पती कर्ण
आंधळ्या प्रेमात तुझ्या, इंद्रानी
कवच कुंडलं उतरवली कपटानी
कारे अर्जुना डाव रडीचा तू खेळला

उन्मत्त असा तू राहीला, नरकात म्हणूनी तू गेला
प्रेम माझे निस्सिम होते, नरकात म्हणूनी मी पण येते
पण अर्जुना, डाव रडीचाच तू खेळला (२)

Shubham Gaigol

द्रौपदी wrong kavita keli ahe as kahi post nko krayche