ये ग सखी अशी…

Started by विक्रांत, June 07, 2014, 11:28:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


सदा तुला घाई
जाण्याची निघुनी
सदा वेळ जाई
बोलल्या वाचुनी

बोलणे बोजड
शब्दात घडेना
मनाचे पाखरू
खाली उतरेना

अडले अपार
मोठाले सागर
तरणे जमेना
तया लाटेवर

वय पद किर्ती
व्यर्थ उठाठेव
प्रेमाला प्रेमच
एक असे ठाव

कुणास ठावूक
केवढा प्रवास
सरतील साल
अथवा दिवस

घडू दे जगणे
दोनच दिसांचे
दान घे हातात
क्षणिक प्रेमाचे

असेल कधी मी 
अथवा नसेल
प्रेम हे आपले
जगात उरेल

प्रेमाला भ्यावे का
जीवना रुसावे
ये ग सखी अशी
मिठीत मरावे

विक्रांत प्रभाकर