असे कसे असते प्रेम

Started by SANJAY M NIKUMBH, June 08, 2014, 07:48:28 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

असे कसे असते प्रेम
==================
जाग येताच क्षणी ओठांवर
तुझेच नावं येते
वाटतं झोपेतही माझं मन
तुलाच घेऊन फिरते

उघडता पापण्या डोळ्यांच्या
समोर तूच उभी दिसते
रात्रभर वाटतं माझं मन
तुझ्याच धुंदीत जगत असते

इतकं खुळ बंर नव्हे
मनाला मी समजावतो
डोकावतांना आरशातही
तुझेच प्रतिबिंब दाखवत असते

असे कसे असते प्रेम
मलाच काही उमजत नाही
पण एकदा प्रेमात पडल्यावर
मन प्रेमाचे होऊन जगत असते
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ८.६.१४  वेळ : ७.३० स .