व्यर्थ जीवन

Started by श्री. प्रकाश साळवी, June 08, 2014, 05:18:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी


संपले आयुष्य सारे काही केल्याविना चांगले
जगलो आयुष्य हे व्यर्थ जीवन  जगण्यातले

चैनीत धुंद झालो, धुंदीत जीवन जागलो
स्वार्थात जीवन धन्य मानले मी मेंढक पाण्यातले

चांगले काही करावे विचार नाही कधीच केला
दुखात दुसरयाच्या स्वताला मी सुख मानले

माणसाच्या जन्मा येऊनी मूर्खपणाने वागलो
गर्दभाची साथ केली अन गर्दभची होऊन राहीले 

कोण आपण? काय करावे विचार याचा केला न कधी
क्षुद्र सुखाला धन्य मानले अन् खऱ्या सुखाला लाथाडले

आयुष्य सारे संपुन गेले आता काय करणार पुढे
जा शरण आता तरी प्रभुला जीवन मरण चुकविण्यास रे

श्री. प्रकाश साळवी