!! व्दार मोक्षाचे !!

Started by शिवाजी सांगळे, June 09, 2014, 04:27:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




आसुसलेली इंद्रिये सारी भोगावया सुख
मान-अपमान, नाही भान काळ वेळेचे !

क्षणिक सुखाची आसक्ती मना या फार
क्षणात मोहाच्या असावे थोरपण मनाचे !!

सुख शोधता कायम जावे शरण भगवंता
नामस्मरण त्याचे, आगर होईल सुखाचे !

दयावे पांडुरंगा ज्ञान ऐसे मूढ पामरा
म्हणे शिवा दावे जनांसी व्दार मोक्षाचे !!


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९