असे आपले प्रेम असावे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., June 09, 2014, 05:19:21 PM

Previous topic - Next topic
असे आपले प्रेम असावे...!!

मी पहावे तू दिसावे,

नजरेत तुझे रुप साठवावे.....

मी लिहावे तू वाचावे,

स्वप्नांच्या जगात रमावे.....

मी रुसावे तू मनवावे,

भावनांना असेच जपावे.....

मी गावे तू गुणगुणावे,

प्रेमनगरीत सुखाने नांदावे.....

मी हसावे तू फसावे,

वेडं मन माझं तुला कळावे.....

जे शब्दात न मांडता,

डोळ्यांनी व्यक्त व्हावे.....

असे आपले प्रेम असावे...!!

असे आपले प्रेम असावे...!!
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०९/०६/२०१४...
दुपारी ०५:१२...
©सुरेश सोनावणे.....


abhijit saste

khupch chan.......
maze hi prem asech asave...
maze hi prem asech asave.....