वीरह गीत !!

Started by श्री. प्रकाश साळवी, June 10, 2014, 04:18:36 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

गायचे नव्हते तरी तू सूर का लावला
नाही म्हणायचेच होते तरी तू जीव का लावला?

जागेपणी मी स्वप्नात रंगलो
उडू लागलो म पंखाविना
गंध फुलांचे नव्हते तरी
सुगंध येऊ लागला पुष्पविना
जगणे जगावे वाटताना श्वास तू का कोंडला?   ||१||

श्वास घेता परी श्वास तू
प्रत्यक्ष श्वास होऊन राहिली
सारे जगाचे विसरून भान मी
फुलापरी फुलताना मी पहिली
प्रीत फुलू लागताना रंग तू का लावला?  ||२||

शिशिरातही दिवस फुलताना
आनंद दाटू लागले
वसंतातले यौवन सारे
मी फुलताना पाहिले
भ्रमर होऊन भ्रमताना गंध तू का लावला?  ||३||

श्री. प्रकाश साळवी दि. १० मे २०१४


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९